पाचोरा (प्रतिनिधी), 14 जानेवारी : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित किशोर पाटील हे आपले वडील किशोर आप्पा पाटील यांच्याप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. असाच प्रकार पाचोऱ्यात पाहायला मिळाला. सुमित किशोर पाटील यांना एका कार्यकर्त्याने फोन केला असता, त्याची समस्या सोडवण्यासाठी ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं –
आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित किशोर पाटील यांना एका कार्यकर्त्याने आपली समस्या सोडविण्यासाठी फोन केला तसेच आपल्या समस्या सांगितल्या आणि मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. त्यावर सुमित पाटील यांनी उत्तर दिले की, तुम्ही मला भेटायला न येता तुम्ही कुठे आहात, मीच तुम्हाला भेटायला येतो.
यानंतर कुठलाही विलंब न करता सुमित किशोर पाटील यांनी लगेच आपली गाडी काढली. यानंतर त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आणि त्याची समस्या सोडण्यासाठी सुमित पाटील हे पाचोरा शहरातील श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले. तसेच यानंतर गाडीतून उतरून त्यांनी त्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या अडीअडचणी व समस्या संदर्भात चर्चा करून त्याला सहकार्याची भूमिका केली.
पाचोऱ्यात सध्या शिवसेनेची सत्ता –
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा भडगाव मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार किशोर आप्पा पाटील हे दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. यानंतर मात्र, जून महिन्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यात पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचोरा तालुक्यातही शिवसेनेमध्ये दोन गट झाले आहेत.
हेही वाचा – आगामी निवडणुकांसाठी संघटनेची बांधणी, शिवसेना नेत्या वैशालीताईंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
किशोर पाटील यांच्या बहीण वैशालीताई सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार किशोर पाटील यांच्यासमोर त्यांच्या घरातून म्हणजे त्यांच्या बहिणीचे वैशाली ताई सुर्यवंशी यांचे आव्हान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपण शिंदे गटात जाण्याचा निर्णय कसा योग्य होता, हे आमदार किशोर पाटील सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यातच आता त्यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील हेसुद्धा तालुक्यातील मतदारसंघात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कुठल्याही लग्नात किंवा सुखदुःखात ते हजर राहत असतात. आमदार किशोर पाटील यांच्यासोबत त्यांचे पुत्राचेही फोटो पोस्टर्सवर दिसतात. त्यामुळे आगामी काळात आमदार पुत्राकडे युवा नेतृत्त्व म्हणून पाहिले जात आहे.