अमळनेर, 7 मे : अमळनेर येथील खा.शि.मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ.संदेश बिपिन गुजराथी तर कार्योपाध्यक्ष पदी नीरज दिपचंद अग्रवाल यांची प्रताप महाविद्यालयात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत नुकतीच निवड करण्यात आली.
मावळते कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, आदी उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्षपदासाठी डॉ. गुजराथी यांच्या नावाची सूचना हरी भिका वाणी यांनी मांडली. तर कार्योपाध्यक्ष पदासाठी नीरज अग्रवाल यांच्या नावाची सूचना प्रदीप अग्रवाल यांनी मांडली. अखेर सर्व संमतीने दोघांची निवड जाहीर करण्यात आली. निवड होताच महाविद्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
त्यानंतर सभागृहात सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मंचावर सर्व संचालक मंडळासह अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरी पाटील, जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. पराग पाटील, शिक्षक प्रतिनिधी, विनोद कदम, मुख्याध्यापक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मावळते कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे ,विद्यमान कार्याध्यक्ष डॉ संदेश गुजराथी यांनी मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी केले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, प्रविण पाटील, लालचंद सैनांनी, जितेंद्र जैन, विजय पारेख, सुभाष अग्रवाल, प्रभाकर पाटील, राकेश माहेश्वरी, मुन्ना शर्मा, विवेक भांडारकर, संध्या शाह, राजू फाफोरेकर, राजू नांढा, मच्छीन्द्र लांडगे,अनिल रायसोनी,हिंदुजा,दिनेश नाईक,महेश पवार,गोटू गांधी,मुरली बितराई,शाह,प्राचार्य देवरे,जे पी पाटील,विक्रम शाह,रोहित सिंघवी,सुनिल वाघ,नाना शुल्क, प्रविण जैन, साहेबराव शेजवळ, ऍड विवेक लाठी, विवेक संकलेचा, डॉ अविनाश जोशी, डॉ निखिल बहुगुणे, पंकज मुंदडा, पप्पू पहाडे, खंडू जैन, भरत कोठारी, विनोद अग्रवाल, प्रकाश मुंदडा, नरेंद्र निकुंभ, दशरथ लांडगे, कैलास सोनार, प्रसाद शर्मा, प्रा. एम एस बडगुजर, राजेश शाह,हेमंत पवार,भोजमल पाटील, सुरेश तात्या, विनोद अमृतकर, दत्ता कासार,गोपी कासार, सहचिटणीस प्रा धीरज वैष्णव व उपस्थित लोकांमध्ये मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, संभाजी पाटील, नितीन निळे उपस्थित होते.
हेही वाचा : उद्धव ठाकरे यांचे ‘मिशन जळगाव’, आज जळगावात जाहीरसभेचे आयोजन