ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 ऑगस्ट : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार 30 ऑगस्टपासून ते 13 सप्टेंबर 2024 या कालवधी दरम्यान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे किर्तन होणार आहे. दरम्यान, किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.
सोहळा आनंदाचा, सप्ताह कीर्तनाचा –
सोहळा आनंदाचा..सप्ताह किर्तनाचा या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार पाचोरा-भडगाव वासियांच्या भेटील येणार आहेत. दरम्यान, कीर्तन हे भगवंतांच्या भक्तीचे मुख्य साधन आहे असे म्हटले जाते आणि याच अनुषंगाने आपल्या भडगाव-पाचोरा मतदारसंघात मी महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांचा “सोहळा आनंदाचा, सप्ताह कीर्तनाचा” हा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे या ठिकाणी होणार किर्तन –
- ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक – 30 ऑगस्ट 2024, शुक्रवार रोजी – कैलामाता मंदिराजवळ, पाचोरा
- ह.भ.प. शब्दप्रभू संग्राम महाराज भंडारे – 31 ऑगस्ट – शनिवार – जि.प.शाळा गाळण बु. ता. पाचोरा
- ह.भ.प. मुक्ताईदास विशाल महाराज खोले – 1 सप्टेंबर – रविवार रोजी – पाटील मंगल कार्यालय, नगरदेवळा ता.पाचोरा
- ह.भ.प. पुरूषोत्तमजी महाराज बुलढाणेकर – 2 सप्टेंबर – सोमवार रोजी – माहिजी देवी मंदिर, माहेजी ता. पाचोरा
- ह.भ.प. शिवलीलाताई महाराज बार्शीकर – 3 सप्टेंबर – मंगळवार रोजी – माळी मंगल कार्यालय, पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा
- ह.भ.प.युवकवीर ज्ञानेश्वर महाराज पठाडे – 4 सप्टेंबर – बुधवार रोजी – राज मंगल कार्यालय, कोळगाव ता. भडगाव
- ह.भ.प. कांचनताई महाराज जगताप – 5 सप्टेंबर – गुरूवार रोजी – मंदिर आवार – बाळद बु. ता. पाचोरा
- ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर – 13 सप्टेंबर – शुक्रवार – भडगाव