चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 3 जुलै : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीतीत अनेक विद्यमान खासदारांचे तिकिट कापण्यात आले होते. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील रामटेकचे तत्कालीन खासदार कृपाल तुमाने तसेच यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचा समावेश होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघं राजकीय नेत्यांचा पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला असून त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळाली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
विधानपरिषदेतील 11 सदस्यांची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषेसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजप 5 तर शिंदेंची शिवसेना 2 आणि अजित पवार गट 2 जागांवर निवडणूक लढत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 1 आणि काँग्रेस 1 तसेच शेतकरी कामगार पक्ष 1 जागावर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, यासाठी या सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून यांना मिळाली उमेदवारी –
विधानपरिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना विधानपरिषदेची उमदेवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. तसेच त्यांनी आपला शब्दही पाळला आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार –
- पंकजा मुंडे (भाजप)
- परिणत फुके (भाजप)
- सदाभाऊ खोत (भाजप)
- अमित गोरखे (भाजप)
- योगेश टिळेकर (भाजप)
- भावना गवळी (शिंदे गट)
- कृपाल तुमाने (शिंदे गट)
- शिवाजीराव गर्जे (अजितदादा गट)
- राजेश विटेकर (अजितदादा गट)
- मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट)
- प्रज्ञा सातव (काँग्रेस)
- जयंत पाटील (शेकाप)
हेही वाचा : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ‘या’ ॲपवर करता येणार