• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

खबरदार! ……आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड, काय आहे नेमकं विधेयक?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 6, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
खबरदार! ……आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड, काय आहे नेमकं विधेयक?

मुंबई, 6 जुलै : गेल्या काही वर्षांमध्ये शासकीय नोकरभरतीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटीचे अनेक प्रकरण समोर आले होते. दरम्यान, यावर शासनाने कायदा केला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये कॉपीसारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी कायदा करण्याबाबतचे विधेयक राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत मांडले. ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम’ असे या कायद्याचे नाव आहे. राज्यातील मंत्री शंभूराज देसाई यांनी विधेयक पटलापुढे ठेवले.

‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम’ –
स्पर्धा परीक्षा ही गुणवत्ता आधारित निवडीमध्ये आणि शिक्षण व रोजगारात समान संधी सुनिश्चिती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्यामुळे परीक्षांना विलंब होतो तसेच परीक्षा रद्द होतात, त्यामुळे लाखो युवकांच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम होतो.

मात्र, परीक्षांमध्ये गैरप्रकार करणारे किंवा पेपर फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने हा कायदा केल्यानंतर राज्य सरकारनेही त्याबाबत पावले उचलली असून कायद्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. याच अधिवेशनात हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

विधेयकातील तरतुदी –

  • स्पर्धा परीक्षेत कोणत्याही उमेदवाराने स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मदतीने परीक्षेत कोणत्याही लिखित, अ-लिखित, नक्कल केलेल्या, मुद्रित केलेल्या साहित्याचा, इलेक्ट्रॉनिक किंवा आयटी उपकरणांमधून मिळविलेल्या साहित्याचा बेकायदेशीर वापर करणे.
  • परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार करणे हा गुन्हा समजला जाणार.
  • प्रश्नपत्रिका, उत्तर तालिका (आन्सर की) किंवा त्याचा कोणताही भाग फोडणे, त्यासाठी इतरांशी संगनमत करणे – कोणत्याही प्राधिकाराशिवाय प्रश्नपत्रिका किंवा एखादे ऑप्टिकल मार्क रेकग्निशन रिस्पॉन्स (अनुक्रिया) पत्र किंवा इतर कोणत्याही पद्धतीची उत्तरपत्रिका अनधिकृतपणे मिळविणे किंवा ताब्यात घेणे.
  • स्पर्धा परीक्षेच्या कालावधीत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीद्वारे एक किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे पुरविणे.
  • परीक्षेमध्ये उमेदवारास प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहाय करणे.
  • ऑप्टिकल मार्क रेकग्निशन रिस्पॉन्स (अनुक्रिया) पत्रांसह उत्तरपत्रिकांमध्ये अनधिकृतपणे फिरवाफिरव करणे.
  • कोणत्याही प्राधिकाराशिवाय वास्तविक दोष दुरुस्त करण्याखेरीज मूल्यनिर्धारणामध्ये फेरफार करणे.
  • एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवारांची चाळणी यादी तयार करण्यासाठी अथवा उमेदवारांचे गुण किंवा गुणवत्ताक्रम अंतिम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही दस्तऐवजामध्ये अनधिकृतपणे फिरवाफिरव करणे.
  • संगणक नेटवर्कमध्ये अथवा संगणक प्रणालीमध्ये अनधिकृतपणे फिरवाफिरव करणे.
  • उमेदवारांच्या बैठक व्यवस्थेमध्ये, परीक्षेचा दिनांक किंवा सत्र वाटपात हातचलाखी करणे.
  • बनावट संकेतस्थळ तयार करणे तसेच बनावट परीक्षा घेणे, बनावट प्रवेश पत्रे निर्गमित करणे किंवा नियुक्तीपत्रे देणे.

काय आहे शिक्षेची तरतूद? –

  • दोषींना 3 ते 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख दंड.
  • सेवा पुरवठादार दोषी आढळल्यास त्याला एक कोटी रुपयांपर्यंत दंड, मालमत्ता जप्तीचाही अधिकार तसेच चार वर्षे कोणतीही स्पर्धा परीक्षा घेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे.
  • संस्थेच्या संचालक, व्यवस्थापक किंवा प्रभारी व्यक्ती या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास त्यांना 3 ते 10 वर्षांपर्यंत कारावास आणि एक कोटी रुपये दंडाची शिक्षा.
  • जर एखाद्या व्यक्तीने सदर गुन्हा नकळत घडला होता आणि प्रतिबंध करण्याकरिता दक्षता घेतली होती, असे सिद्ध केले तर, ती व्यक्ती शिक्षेस पात्र असणार नाही, अशी तरतूदीचा समावेश.

कोणत्या परीक्षा कायद्याच्या कक्षेत?

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा.
  • कोणत्याही प्राधिकरणाने, निवड समितीने, सेवा पुरवठादाराने किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेने घेतलेल्या परीक्षा.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आणि शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा.

हेही वाचा : मोठी बातमी! नाशिकमध्ये एसीबीचा ट्रिपल धमाका, एकाच दिवशी तीन लाचखोरांना पकडले रंगेहाथ

बातमी शेअर करा !
Share
Tags: monsoon sessionpaper leak casepaper leak provision billshambhuraj desai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page