जालना, 21 जुलै : जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरु आहे. दरम्यान, त्यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना प्रविण दरेंकरांवर जोरदार टीका केलीय. प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केला असून आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
मनोज जरांगे काय म्हणाले? –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, दरेकर माझ्या भोवती असणाऱ्या मराठ्यांना आमिष दाखवत फोडत आहे. माझ्या विरोधात बोलायला लावत असून दरेकर वाटोळं करणारा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस बस म्हणाले तिथं बस म्हणणारा हा माणूस आहे. त्याला मराठ्यांविषयी काही देणेघेणे नाही. काल ते लेकरू रडले ते त्यांना भंपकपणा वाटते. दरम्यान, दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केला आहे. जातीत गद्दार आहेत आणि जे नाही ते खोटे बोलायला आहे. असे म्हणत मनोज जरांगे यांनी आमदार प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल केला.
प्रविण दरेकर काय म्हणाले होते? –
मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून टीका करत आहेत. यामध्ये काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. प्रविण दरेकर म्हणाले होते की, आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात, सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण आहे. यातून जरांगे बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार असल्याचा इशाराच दरेकर यांनी जरांगेंना दिला आहे. यावर आज मनोज जरांगे यांनी दरेकर यांच्यावर जोरदार टीका केली.
हेही पाहा : Special Interview : ‘त्या’ शाळांना आरटीईची प्रक्रिया राबवावीच लागेल – अॅड. दीपक चटप यांची विशेष मुलाखत