आंतरवाली (जालना), 14 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
राज्य सरकारने मागील महिन्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सगेसोयरांची अधिसूचना काढली होती. मात्र, आता अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले? –
राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणीशिवाय मी पाणी पिणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच सरकारने 15 तारखेचे अधिवेशन 20 तारखेवर ढकलल्याने जरांगे नाराज झाले आहेत. तत्पूर्वी, काल मनोज जरांगे यांच्य वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हास्तरीय पथक दाखल झाले होते. दरम्यान, जरांगे यांनी यावेळी तपासणीस नकार दिला होता.
मनोज जरांगे यांच्या मागण्या –
- मराठा आरक्षणाबाबत सरकराने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी.
- राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यात यावे.
- आंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
- राज्यभरात शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतींवर लावण्यात यावी.
हेही वाचा : भडगाव येथील आदित्य ठाकरे यांची सभा ऐतिहासिक होणार – वैशाली सुर्यवंशी