ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 3 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे ग्रामदैवत मरी माता यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी हा यात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे.
सालाबादप्रमाणे हा यात्रोत्सव साजरा होत असून या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच रात्री तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रोत्सवासाठी लासगाव ग्रामस्थांकडून तयारी करण्यात आली असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.






