वर्धा, 1 ऑगस्ट : राज्यातून विविध घटना समोर येत असताना वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. पूजा रजानी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलंय. दरम्यान, पूजाने आत्महत्या का केली याबाबत पोलिस तपास करत आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा रजानी ही वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाला होती. दरम्यान, मेडिकलचे शिक्षण घेत असताना या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली. यामुळे मेडिकलच्या क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थीनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
आत्महत्येनंतर कुटुंबियांचा आरोप –
पूजा रजानीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी कॉलेज व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे कारण पुढे करून विद्यार्थीनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पूजाने स्वःला का संपवलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह सावंगी पोलीस रूग्णालयात दाखल झाल्याची देखील माहिती आहे. तसेच विद्यार्थ्यांची कॉलेज प्रशासनासोबत पोलिसांची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : मैत्रिणीनं इन्स्टाग्रामवर बनवलं फेक अकाऊंट, तरुणी पडली प्रेमात, बनावट लव्ह स्टोरीत एकीची आत्महत्या