मुंबई, 3 मे : राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही लोकप्रिय ठरली आणि विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला त्याचा मोठा फायदा देखील झाला. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेच्या निधीत वाढ करणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे विरोधकांकडून लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका केली जात. अशातच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली असताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या? –
महायुतीच्या सरकारची लाडकी बहिण योजना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. दरम्यान, ही योजना अशाच प्रकारे पुढे सुरू राहणार असून लवकरच लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता हा लवकरच वितरित होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. मंत्रालयात पार पडलेल्या कॅबीनेट बैठकीनंतर त्या माध्यमांसोबत बोलत होत्या.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
अडीच हजारांहून अधिक सरकार नोकरी करणाऱ्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघड झाले आहे. यावर राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, काही सरकारी कर्मचारी महिला यांनी लाडकी बहिण योजनेत अर्ज करत योजनेचा फायदा घेतलाय. मात्र, ही अतिशय चुकीची बाब असून असे होताच कामा नये. दरम्यान, अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार असून त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
View this post on Instagram
सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ –
सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सुमारे 2 हजारांहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून ते अपात्र आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तर दुसकरीकडे लाडकी बहिण योजना लागू करताना सर्व अर्जदारांची नीट पडताळणी न केल्यामुळे काही अपात्र महिलांनाही याचा लाभ मिळाला. निवडणुका जवळ आल्यामुळे वेळेअभावी ही चूक झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मान्य केले आहे.
हेही वाचा : जळगावात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; ठाकरेंच्या शिवसेनेचे अनोखे आंदोलन; महापालिका आयुक्तांना धरले धारेवर