• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा शहर व परिसरात,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 22, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पाचोरा शहर व परिसरात,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 22 सप्टेंबर : पाचोरा शहर व परिसरातील,गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, बाधित झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. या भागात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे,हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे सकाळी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे  नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली, यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

या पाहणी दरम्यान, पालकमंत्री यांच्या समवेत  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रत्यक्ष पाण्यात चालत जाऊन आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेत बाधित कुटुंबांना धीर देऊन मदतीचा विश्वास दिला. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपच्या वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, माजी जि.प. सदस्य मधूकर काटे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की,पाचोरा शहर व  परिसरातील गावांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्यामुळे या परिसरातील बऱ्याच घरांमध्ये, दुकानांमध्ये, शेती पिकांमध्ये  पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचे, घरातील साहित्याचे, अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संदर्भात स्थानिक प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.या संदर्भातले अहवाल प्राप्त झाल्यावर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले.


 आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही –

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, काल रात्रीपासून पाचोरा तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे पाचोरा शहरांमध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरले असून  येथील घरांचे, दुकानांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले असून शासन मदतीसाठी पूर्णपणे आपल्या पाठीशी उभे आहे.  एनडीआरएफच्या निकषानुसार शासनाकडून तात्काळ सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पाचोरा तालुक्यात रविवारी रात्रभरापासून ते सकाळ पर्यंत जवळपास दीडशे मिलिमीटरच्या वर पाऊस  झाल्यामुळे या परिसरात शेती पिकाचे, घरांचे,दुकानांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असल्यामुळे,संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी, आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली.

पाचोरा शहरी भागात रविवारी रात्री व आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा शहरातील,जनता वसाहत,बहिरम नगर यासह अन्य भागात नागरिकांच्या घरात, नदीचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान, झाले असून,तालुक्यातील खडकदेवळा, गाळण, नाचनखेडा गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी, नगर परिषद व स्थानिक प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नगरपरिषद, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने एसडीआरएफ पथक आपत्तीग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करत असून जिल्हा प्रशासन या भागातील परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राची कन्या प्रियंका मोहितेची आणखी एक मोठी कामगिरी, जगातील 8 व्या क्रमांकाचे शिखर केले सर

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajangulabrao patilkishor appa patilpachora floodpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page