• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home रावेर

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडला औचित्याचा मुद्दा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 29, 2026
in रावेर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, यावल
VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

मुंबई, 29 जून: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सभागृहात प्रभावीपणे वाचा फोडली. वारंवार येणाऱ्या वादळांमुळे होणारे शेतीचे नुकसान, पीक विमा कंपन्यांकडून मिळत नसलेली भरपाई तसेच हवामान बदलाच्या गंभीर परिणामांचा मुद्दा त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला.

आमदार अमोल जावळे काय म्हणाले? –

रावेर-यावल परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टी, वादळे आणि बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे. यंदाही एप्रिल, मे आणि जून महिन्यात आलेल्या वादळांमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच पीक विम्याअंतर्गत संरक्षित असलेल्या संपूर्ण क्षेत्राची भरपाई संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

रावेर-यावल क्षेत्रासाठी विशेष मागणी –

याशिवाय रावेर-यावल परिसरात वारंवार होणारी वादळे आणि ढगफुटीसारख्या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी भारत सरकारचा हवामान विभाग, राज्याचा कृषी विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष तज्ज्ञ गट स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली.

दरम्यान, सातपुडा पर्वतरांगांतील जंगलतोड, तापी नदी परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानातील बदल यांचा सर्वांगीण अभ्यास करून रावेर-यावल क्षेत्राला ‘क्लायमेट सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित करावे. त्यामुळे विशेष निधी उपलब्ध होऊन भविष्यातील नैसर्गिक आपत्तींचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे सामना करता येईल, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

हेही वाचा: राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: banana-growing farmersmarathi newsmla amol jawalesuvarna khandesh livevidhansabhawinter session 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

June 29, 2026
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

June 29, 2026
TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

June 29, 2026
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

June 29, 2026
महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

June 28, 2026
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

June 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page