संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 28 सप्टेंबर : आगामी विधानसभेला आपल्या विकासकामांचा व महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा आधारे सामोरे जा, असे आवाहन पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. आगामी विधानसभेची निवडणुकीचा अनुषंगाने शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व इतर आघाडींची विस्तृत बैठक शहरातील विजया लॉन येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व दि.जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी दुरध्वनीव्दारे संबोधित केले.
अमोल पाटील यांनी मुख्य प्रस्तावना करतांना बुथ स्तरावर करावयाचे नियोजन, एरंडोल विधानसभेत सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा, महायुती सरकारने महिला, युवक, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध योजना यांसह अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी एरंडोल शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, शिवसेना एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे सुत्रसंचलन मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे एरंडोल विधानसभा अध्यक्ष कुणाल महाजन यांनी केले, प्रस्तावना शिवसेना सोशल मिडिया विभागाचे प्रमुख योगेश्वर पुरोहीत यांनी केले.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview
सर्वप्रथम दिपप्रज्वलन, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून वंदन करण्यात आले, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन करण्यात आले. यावेळी एरंडोल विधानसभेच्या महायुतीच्या समन्वयकपदी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, एरंडोल शहरप्रमुखपदी एरंडोल नगरपरिषदेचे मा.नगरसेवक नितीन चैत्राम चौधरी (बबलु पहेलवान), एरंडोल शहरप्रमुख (पुराभाग) शहरप्रमुखपदी अतुल सुभाष मराठे, मागासवर्गीय सेनेचे शहरप्रमुख अमोल किशोर तंबोली, पारोळा युवासेनेचा शहरप्रमुखपदी अमोल मराठे यांची नियुक्ति करण्यात आली.
शिवसेनेत जाहीर प्रवेश –
यासमयी आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गालापुर येथील सचिन महाजन, वनकोठे प्रकाश बोरसे, एरंडोल येथील पंकज चौधरी, उत्राण मा सरपंच राजुभाऊ पाटील, चोरवड येथील उपसरपंच विजय भीमराव पाटील, चोरवड येथील मा.उपसरपंच निंबा रतन पाटील, चोरवड येथील मा.उपसरपंच किरण जिजाबराव पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, शेतकी संघाचे संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, पोपट चव्हाण, जिल्हा दुध संघाचे संचालक दगडु चौधरी, रावसाहेब भोसले, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, जिल्हा बँकेचे मा.संचालक डॉ.सतिष देवकर, पं.स.मा.सभापती अनिलभाऊ महाजन, गबाजी पाटील, धरणगाव बाजार समितीचे उपसभापती किरण पाटील, संचालक देविदास चौधरी, पारोळा तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष विजु पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, एरंडोल तालुकासंघटक संभा पाटील, युवासेना मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील, पारोळा युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मा.नगरसेवक मनोज जगदाळे, एरंडोल व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख परेश बिर्ला, एरंडोल युवासेनेचे शहरप्रमुख कृष्णा ओतारी, शेतकी संघाचे मा.संचालक नथाबापु पाटील, पारोळा शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, धरणगांव बाजार समितीचे मा.संचालक गजानन पाटील, कासोदा मा.सरपंच महेश पांडे, धुळपिंप्री मा.सरपंच संजु पाटील, खेडी येथील पन्ना सोनवणे, आडगांव उपसरपंच डि.एन.पाटील, आमडदे येथील संभाजी भोसले, वनकोठे येथील नंदु मोहिते, एरंडोल शहरसंघटक मयुर महाजन, आनंदनगर येथील देशमुख राठोड यांसह सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व इतर आघाडींचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, प्रत्येक गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रत्येक गावातील विविध कार्यकारी सोसायटींचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, प्रत्येक गावातील बुथचे बुथप्रमुख, शिवदुत, सदस्य व मोठ्या संख्येने माता-भगिणी व प्रत्येक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत