• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

तिसऱ्यांदा मला मतदारसंघातील जनता विधानसभेत पाठवेल; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

पुढच्या पाच वर्षात राज्यात 'पाचोरा-भडगाव पॅटर्न' नावाजेल; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले मत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 18, 2024
in भडगाव, ताज्या बातम्या, पाचोरा
तिसऱ्यांदा मला मतदारसंघातील जनता विधानसभेत पाठवेल; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 नोव्हेंबर : गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार आहे. पाचोरा भडगाव मतदार संघ हा विकासाचे एक पॅटर्न मला करायचा आहे. पुढच्या पाच वर्षात राज्यात ‘पाचोरा-भडगाव पॅटर्न’ नावाजेल हा माझा शब्द आहे, असे मत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

तिसऱ्यांदा मला ही जनता विधानसभेत पाठवेल –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनतेने माझ्यावर सलग दोन टर्म प्रचंड विश्वास दाखवत मला विधानसभेत पाठविले. मी ही मतदारांच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. मी मायबाप जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्याने शंभर टक्के तिसऱ्यांदा मला ही जनता विधानसभेत पाठवेल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.

पाचोरा-भडगाव शहराचे रूपडे बदलवले –
या शेवटच्या अडीच वर्षात पाचोरा व भडगाव शहरात प्रचंड विकास कामे करण्याचा मी प्रयत्न केला. त्यात पाचोरा शहरात भूमिगत गटार योजना, रस्त्या काँक्रीटीकरणाचा डीपीआर, खुल्या जागेचा विकास, शहरातील विविध व्यापारी संकुलांची निर्मिती, भाजी मंडई, हिवरा नदिवरील पुलाचे बांधकाम, वाचनालय, व्यापारी भवन, क्रीडा संकुल, अल्पसंख्यांक भागात केलेली कोट्यावधीची कामे, जनता वसाहत भागातील बौध्द विहारात सभामंडप, पेव्हर ब्लॉक, यासह इतर मागासवर्गीय वस्तीत झालेले विविध कामे, प्राचीन प्रभु श्रीराम मंदिर परिसराचा विकास, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महाराणा प्रताप चौक ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत शुसोभिकराचे सुरू असलेले काम असे एक ना शेकडो कामे आपण केली याशिवाय मंजुर करण्यात आलेले वारकरी भवन, कृषी भवनाचे कामे मार्गी लावले.

भडगाव शहरात विकासाचे दालन उडविण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. शहरासाठी 133 कोटीची पाणीपुरवठा योजना, 82 कोटीची भूमिगत गटार योजना, सर्व ओपनस्पेसचा केलेला विकास, तळणी व श्री स्वामी समर्थ मंदिराचा पर्यटन विकासाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. साई मंदिर परीसरात करण्यात आलेले कामे,मुख्य रस्त्यांचे झालेले काँक्रीटीकरण आदी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केले. तर तब्बल 170 कोटीचा रस्ता काँक्रीटीकरणाचा डीपीआर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

ग्रामीण भागाचाही साधला विकास –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, दोन्ही शहराचा जसा विकास केला त्या प्रमाणातच ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे काम केले आहे. प्रत्येक गावात चौक सुशोभीकरणाच्या माध्यमातून शिवस्मारक, काही गावात वीर एकलव्य स्मारक, पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा, व्यायामाचे साहित्य आदि कोट्यावधींचे विकास कामे पुर्णत्वास नेली. याशिवाय गडद, अग्नावती, तितुर नद्यांसह छोट्या नदी नाल्यांवर शेकडो बंधारे बांधून शेती समृध्द करण्याचे काम केले. गिरणा नदिरवर तब्बल सात ठीकाणी पुल बांधले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ताचे जाळे विनले. पहूर ते पाचोरा रस्त्यासाठी 300 कोटी रूपये मंजुर केले आहेत. याशिवाय 380 कीलोमिटरचे शेत पाणंद रस्ते मंजूर केले आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगीतले.

आरटीओ कार्यालयाने भडगावची देशभर ओळख –
भडगाव येथे आरटीओ कार्यालयाची 10 वर्षापासूनची मागणी होती. त्याबाबत माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र शासनाने चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय मंजुर केले. मात्र अशाही परीस्थीतीत भडगाव येथे जिल्ह्यातील तिसरे आरटीओ कार्यालय निर्माण करून भडगाव ची ओळख देशभर नेण्याचे काम केले. याशिवाय नगरदेवळा सुतगिरणीजवळ एमआयडीसीत मंजुर करून घेतली. त्यासाठी अडीचशे हेक्टर जमीन अधिग्रहहीत करण्यात आली आहे. पाचोरा व भडगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यात पाचोरा येथील इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर भडगाव येथील जागा निश्चितीचे काम सुरू आहे.

‘असे’ आहे आमदार पाटील यांचे विकासाचे व्हिजन –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघ दत्तक घेण्याचे वचन दिले. त्यामुळे राहिलेला विकास पुर्ण करण्याचे माझे स्वप्न आहे. पुढच्या टप्प्यात पाचोरा व भडगाव तालुक्यात गिरणा नदीवर पक्के बंधारे बांधणार, नार-पार-गिरणा नदिजोड प्रकल्पाचे जास्तीचे पाणी मतदारसंघात आणणार, मंजुर एमआयडीसीत मोठे उद्योग आणून व सुतगिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मीती करणार. भडगाव शहरात छत्रपती शिवाजीमहाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनविणार, पाचोरा शहरात क्रांतीसुर्य महात्मा फुले,छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणार, पाचोरा शहरात नाट्यगृहाची निर्मिती करणार, इगतपुरीच्या धर्तीवर विपश्यना केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिवशृष्टी, भडगाव शहरातील रस्त्याचा 170 डीपीआर ला मंजुरी मिळवून देण्यासह विविध कामाचे स्वप्न मी उराशी बाळगले आहे, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुढील व्हिजनबाबत बोलतांना सांगीतले.

दरम्यान, या सर्व विकासकामान मुळे मायबाप जनता ही कोणत्याही भूलथापांना बळी न पडता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला केलेल्या कामाचा योग्य मोबदला मतदान आरोपी देऊन मला पुन्हा त्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देईल याचा दृढ विश्वास मला असल्याचे देखील त्यांनी मुलाखतीच्या शेवटास सांगितले.

हेही वाचा : प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक, दिग्गजांच्या झाल्या सभा, आता प्रतीक्षा मतदानाची, स्पेशल रिपोर्ट…

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patil newsmla kishor appa patilmla kishor appa patil newspachora latest newssuvarna khandesh live newsvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page