पाचोरा, 20 एप्रिल: पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची नुकतीच शिवसेनेच्यावतीने अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आज 20 एप्रिल रोजी किशोर आप्पा पाटील यांचा शाल बुके व हार देऊन करण्यात आला.
माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेचे राजाराम नागो सोनार, सचिव के. एस. महाजन, सहसचिव शांताराम चौधरी, उपाध्यक्ष युवराज भगवान महाजन, पी.एम. जाधव, शेलार नाना, संचालक एम. एस. महाजन, संतोष दला पाटील, छगन पंढरीनाथ पाटील, दिलीप जोशी, विजय सागर, सुधाकर नथू पाटील, आबाजी तुकाराम पाटील, बारकू चित्ते, सुनील चित्ते यावेळी उपस्थित होते.
माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार करताना त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. तसेच आगामी काळात पाचोरा-भडगाव तालुक्याला किशोर आप्पांच्या माध्यमातून कॅबीनेट मंत्रीपद मिळावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.






