ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 27 नोव्हेंबर : भडगाव तालुक्यातील एका गावात मूकबधीर महिलेवर झालेल्या अत्याचारविरोधात आज निषेध मोर्चा काढण्यात आला. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज दुपारी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासित केले. तसेच आंदोलनावेळी महिंदळे येथील अवैध दारूबंद व्हावी, अशी मागणी महिलांनी केली असता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तात्काळ दारूबंद करण्यात यावी, असे आदेश भडगाव पोलिसांना दिले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
भडगाव तालुक्यातील एका गावात 65 वर्षीय मूकबधीर महिलेवर 27 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असताना आरोपीला तत्काळ कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आज 27 नोव्हेंबर रोजी भडगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आंदोलनबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील हे भडगावात दाखल झाले.
कृपया, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
यावेळी आमदार पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या पुरुष-महिलांना मूकबधीर महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यार असल्याचे आश्वासित केले. तसेच सदर प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.
दरम्यान, मंहिदळे परिसरातील अवैध दारूबंद करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलांनी केली. यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दोन दिवसाच्या आत त्याठिकाणची दारुबंद करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थितांना दिले. तसेच महिलांच्या मागणीची दखल घेऊन भडगाव पोलिसांच्यावतीने अवैध दारूविरोधात कारवाई करण्यात यावी, असे आदेश आमदार पाटील यांनी दिले.
काय नेमकं प्रकरण? –
भडगाव तालुक्यातील एका गावात 65 वर्षांच्या मूकबधीर महिलेवर एका 27 वर्षीय तरुणाने अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला यातून बचावली. परंतु जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, सदर प्रकरणातील आरोपी अटकेत आहे.
हेही वाचा : मोठी बातमी : “….अभी तो सारा आसमान बाकी हैं!” एकनाथ शिंदेंनी केली मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका स्पष्ट