ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 ऑक्टोबर : मतदारसंघातील जनतेने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी कशा पद्धतीने निभावली तसेच गेल्या पाच वर्षांत नेमकी कोण-कोणती कामे केलीत, याचा हिशेब देण्यासाठी “चला विकासावर बोलू या” सभेचे 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता अटल मैदानावर आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी दिली. शिवालय त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार किशोर पाटील यांनी दिली माहिती –
मतदारसंघातील जनतेने माझ्यावर जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी मी पाच वर्षात कशा पद्धतीने निभवली तसेच त्या जबाबदारीच्या माध्यमातून मी काय विकासाची कामे केली, याचा हिशोब देण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता अटल मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. तत्पुर्वी, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचा 2014 साली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी 2019 साली पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब दिल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

पाचोऱ्यात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री दादा भूसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ तसेच शेतकरी, व्यापारी तसेच शिवसैनिक यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. तसेच यावेळी मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दहा वर्षांपासून करतायएत प्रतिनिधित्व –
किशोर पाटील यांनी शिवसेनेत संघटनात्मक पदांवर जबाबदारी निभावल्यानंतर पहिल्यांदाच 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार दिलीप वाघ यांचा पराभव केला होता. यानंतर 2019 च्या विधासनभा निवडणुकीत त्यांना अपक्ष उमेदवार तथा विद्यमान भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचा पराभव केला होता. दरम्यान, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे ते गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करत असून आता मागील पाच वर्षांच्या कामाचा ते हिशेब मतदारसंघातील जनतेला देणार आहेत.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिला सुरक्षेवर परखड मत, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष मुलाखत