ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा/जळगाव, 6 ऑक्टोबर : भडगाव व पाचोरा तालुक्यातील सिंचनाचे विविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी आज जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता यशवंतराव भदाने यांची भेट घेत आढावा घेतला.
प्रलंबित समस्या मार्गी लावण्याच्या सूचना –
पाचोरा – भडगांव मतदारसंघातील खडकदेवळा, बहुळा, वडगांव, गाळण या भागांतील धरणावरील तसेच प्रलंबित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना आमदार किशोर पाटील यांनी सूचना केल्या.
तसेच आमदार किशोर पाटील यांनी तापी पाटबंधारे व गिरणा, हिवरा, बहुळा या नद्यांवरील विविध विषयावर चर्चा करत तत्काळ मंत्रालयात संपर्क साधून कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश बापू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) व माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, शीतल सोमवंशी, संदीप सोमवंशी तसेच बाळद, अंतुर्ली जुवार्डी, येथील शेतकरी उपस्थित होते.