• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सातगाव डोंगरीतील पुरामुळे बाधित कुटुंबियांना जाहीर केलेली 1 लाखांची मदत तात्काळ द्या; काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 6, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
सातगाव डोंगरीतील पुरामुळे बाधित कुटुंबियांना जाहीर केलेली 1 लाखांची मदत तात्काळ द्या; काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांची मागणी

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 6 ऑक्टोबर : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात असलेल्या घाटमाथ्यांवर मागील महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे सातगाव डोंगरी परिसरात असलेल्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती. यासोबतच नदीलगतच्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तू, अन्न धान्य तसेच शेतीपिकांचे नुकसान झाले. यासोबतच जनावरांची देखील जीवित हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी सातगाव डोंगरीत झालेल्या नुकसानीची काल 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाहणी केली.

काँग्रेसकडून जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी –

नुकसानीची पाहणी केल्यानंतर शोभा बच्छाव पत्रकारांसोबत बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, भडगाव आणि पाचोरा तालुक्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानीची पाहणी करण्यात आली.


शोभा बच्छाव यांनी केली नुकसान भरपाई मिळण्याची मागणी –

जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीपिके तसेच संसारपयोगी साहित्य, जनावरे आदींचा या नुकसानीत समावेश आहे. दरम्यान, तहसीलदार तसेच तलाठींच्या माध्यमातून सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी शोभा बच्छाव यांनी केली.

‘त्या’ कुटुंबियांना जाहीर केलेली 1 लाख रूपयांची मदत देण्यात यावी –

खासदार शोभा बच्छाव यांनी सातगाव डोंगरीतील पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. यावेळी संबंधित नागरिकांनी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना जाहीर झालेली 1 लाख रूपयांची मदत मिळाली नसल्याचे शोभा बच्छाव यांना सांगितले. याबाबत बोलताना खासदार बच्छाव म्हणाल्या की,  सातगाव डोंगरीतील 175 ते 200 घरांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले असून येथील आमदारांनी याठिकाणी पाहणी केली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी 1 लाख रूपये प्रति कुटुंब देण्याची घोषणा केली होती.

मात्र, अद्यापही ती मदत संबंधितांना मिळालेली नाहीये. दरम्यान, ज्यापद्धतीने नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते त्यानुसार मदत दिली पाहिजे. यासोबतच संपुर्ण महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी शेतीपिके, घरे तसेच जनावरे आदी बाबींचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी खासदार शोभा बच्छाव यांनी केली.

हेही वाचा : तरुणाईसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा – ‘2026 हे पदभरतीचं वर्ष असणार!’

बातमी शेअर करा !
Share
Tags: families affected by floodmp shobha bachhavpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

July 22, 2026
शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार

July 22, 2026
पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन अन् रेशन दुकानदारावर अखेर कारवाई, नेमकं बातमी काय?

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम संचालनालय आणि बाएफ यांच्यात सामंजस्य करार

July 22, 2026
जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page