जळगाव, 28 मार्च : केळी पिक विम्याबाबत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव 9600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची (ज्या शेतकऱ्यांचे प्रस्तावना एप्रोवल Approval मिळून देखील नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते) अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित होती. दरम्यान, ही नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली की, जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा बाबत सतत पाठपुरावा करत असून या माध्यमातून जिल्ह्यातील 9600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची (ज्या शेतकऱ्यांचे प्रस्तावना एप्रोवल Approval मिळून देखील नुकसान भरपाई चे पैसे मिळाले नव्हते) अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अंदाजित रू. 53 कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यातील 11,300 शेतकरी (ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्रची तफावत होती) अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव व तसेच जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले 6686 (ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले होते) असे सर्व कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आलेले आहेत.
दरम्यान वरील सर्व प्रलंबित असलेले 11300 (किती वाजता क्षेत्रामधील तफावत मुळे रखडलेले) + 6686 (जिल्हास्तरीय समितीने मंजूर करून कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कार्यासाठी पाठवलेले) प्रस्तावनाबाबत देखील पाठपुरावा सुरू आहे. तसेच या प्रस्तावांना देखील लवकरच मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : भाजपचं ठरलं मात्र ठाकरे गटाचं काही ठरेना! स्मिता वाघ यांच्याविरोधात जळगावात कुणाला मिळणार संधी?