मुंबई, 12 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनामावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना पटोले? –
नाना पटोले यांनी ट्विटमध्ये सांगितले की, काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे.
आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असे नाना पटोले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया –
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!…
हेही वाचा : Ashok Chavan Resigns : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम