चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 11 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रावेर मतदारसंघात उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, या उमेदवारीवरून आता शरद पवार गटात नाराजी नाट्यास सुरूवात झाली आहे. श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे वरणगावमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. तसेच वरणगाव येथील कार्यकर्त्यांनी तर थेट शरद पवार यांना पत्र लिहित पक्ष निष्ठेबद्दल खंत व्यक्त केली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केलेले उद्योजक श्रीराम पवार यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. शरद पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांचे नाव रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपुर्वी चर्चेत असताना त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. दरम्यान, रविंद्र पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने वरणगाव येथील कार्यकर्त्यांनी तर थेट शरद पवार यांना पत्र लिहित पक्ष निष्ठेबद्दल खंत व्यक्त केली आहे.
पत्रात काय म्हटलंय? –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटल्यानुसार, आज मोठ्या हिंमतीने तुम्हाला हा छोटासा कार्यकर्ता प्रश्न विचारू इच्छितो आहे की, साहेब आपल्या पक्षात खरच निष्ठेला किंमत आहे का? रावेर मतदारसंघता श्रीराम दयाराम पाटील या महिन्याभरात 3 वेळा पक्ष बदलणाऱ्या, एक ही निवडणूक न लढवणाऱ्या, पक्षासाठी काय तर लोकांसाठी देखील योगदान असलेल्या डमी उमेदवाराला उमेदवारी देऊन तुम्ही पडत्याकाळत पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या, काम करणाऱ्या माजी आमदार संतोष चौधरी आणि रवींद्र पाटील यांना डावलून उमेदवारी दिली, त्यामुळे हा प्रश्न विचारावा लागतो.