• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव ‘ऑनर किलिंग’ प्रकरण : आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 23, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जळगाव ‘ऑनर किलिंग’ प्रकरण : आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश

मुंबई, 21 जानेवारी : जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष 27 या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पण त्यानंतर पूजाच्या घरच्यांसोबत मुकेश शिरसाठचे वारंवार वाद आणि खटके उडत होते. त्यावरून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आणि एनसी दाखल करण्यात आल्या आहेत. पण पळून जाऊन लग्न केल्याचा राग अजूनही पूजाच्या नातेवाईकांच्या मनात होता, या संतापातून त्यांनी मुकेशची निर्घृणपणे हत्या केली. या गंभीर घटनेची तत्काळ दखल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश –
सदर घटनेदिवशी मृत मुकेश शिरसाठचे पूजाच्या घरच्यांसोबत वादविवाद झाले होते. त्यावेळी एकूण आठ-नऊ लोकांपैकी एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि जागेवरच त्याचा जीव गेला. याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

‘ऑनर किलिंगची ही घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे’; असे म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. हा प्रेमविवाह होऊन चार-पाच वर्ष झाली होती त्याचबरोबर मयत मुकेश शिरसाठ व त्याच्या सासरची मंडळी यांच्यात सतत वादविवाद होत असल्याने संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी एनसी तक्रार दाखल करण्यात आली होती. ही बाब विचारात घेता या प्रकरणामध्ये वेळोवेळी पोलिसांमार्फत काय कार्यवाही करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी.

आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी –
ऑनर किलिंग टाळण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस विभागामार्फत काय कार्यवाही यापूर्वी करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास आवश्यक संरक्षण व सुरक्षागृहाची व्यवस्था गरजेनुसार पुरवण्यात यावी. साक्षीदार संरक्षण कायद्यांतर्गत साक्षीदारास आवश्यक संरक्षण पुरविण्यात यावे. आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक व ठोस साक्षी पुरावे मुदतीत संकलित करून चार्जशीट वेळेत दाखल करण्यात यावी. तसेच उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी.

याप्रकरणी अनुभवी निष्णात सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास सामाजिक अर्थसहाय्य योजनेमधून नियमानुसार लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत समाज प्रबोधन व समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात यावी. तसेच, ‘याप्रमाणे कार्यवाही करून उपसभापती कार्यालयास या संदर्भातील अहवाल वेळोवेळी सादर करण्यात यावा’ असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा : “…तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही!” स्वबळावर लढण्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon honor killing casejalgaon latest newsmarathi newsNeelam Gorhe

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

January 15, 2026
Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

January 15, 2026
एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

January 15, 2026
Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

January 15, 2026
जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

January 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page