मुंबई, 3 नोव्हेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंडचा तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड संघाने भारताचा पराभव केला असतानाच तिसऱ्या सामान्यातही न्यूझीलंडकडून भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झालाय. दरम्यान, न्यूझीलंडने भारताविरुद्ध विक्रमी कामगिरी करत 3-0 ने मालिका जिंकत भारतीय क्रिकेट संघाचा दारूण पराभव केला आहे.
न्यूझीलंडने रचला इतिहास –
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा 25 धावांनी पराभव करत मालिका 3-0 अशी जिंकली. एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या धोकादायक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाल्याने अवघ्या 121 धावांत संपूर्ण संघ गडगडला. दरम्यान, भारतीय संघाला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर क्लीन स्वीप मिळाला असून भारतात पहिल्यांदाच न्यूझीलंड संघाने कसोटी मालिका जिंकली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना –
न्यूझीलंड –
पहिला डाव : 235
दुसरा डाव : 174
भारत –
पहिला डाव : 263
दुसरा डाव : 121
न्यूझीलंड 25 धावांनी विजयी