नाशिक, 10 मे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. भूषण लहामगे असे हत्या झालेल्याचे नाव आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर नेमकं काय घडलं?-
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक – मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी उत्तर महाराष्ट्रे केसरी विजेता भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्याची घटना आज घडली. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भूषण लहामागेचा जागीच मृत्यू झाला.
हत्येचे नेमकं कारण काय? –
नाशिक महामार्गावर हा हत्येचा थरार रंगल्यानंतर घटनास्थळी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला असून भूषणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून भूषण लहामागेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींची शरद पवारांना खुली ऑफर! नंदुरबारातील सभेत नेमकं काय म्हणाले?