मुंबई, 19 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारी 2024 हा महत्वाचा दिवस आहे. कारण, उद्या मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मराठा आरक्षण संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून मनोग जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे तसेच सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची त्यांनी मागणी केली होती. दरम्यान, गेल्या 9 ते 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. तर आता राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. म्हणुन 20 फेब्रूवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन राज्य सरकार घेणार आहे.
असे असेल अधिवेशन-
- सकाळी १० च्या सुमारास विधानभवनात मंत्रीमंडळ बैठक
- राज्य मागास आयोगाचा अहवाल मंत्रीमंडळात सादर होणार
- सगेसोयरे अधिसूचनेबाबत कालावधी निश्चित केला जाणार
- सुमारे एक तास मंत्रीमंडळ बैठक झाल्यावर अधिवेशन सुरु होणार
- अधिनेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांचे अभिभाषण
- मराठा आरक्षण बील आणि सगेसोयरे अधिसूचना सभागृहाच्या पटलावर मांडली जाणार
- अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनाने अधिवेशनाचा समारोप
हेही वाचा : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले ?