जळगाव, 29 जानेवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) नुकतेच संयुक्त स्पर्धा परीक्षा अंतर्गत 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच या पदांच्या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. या संयुक्त 8169 पदांच्या परीक्षेसाठी जळगाव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रसिद्ध अशा दर्जी फाऊंडेशनमध्ये मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
मार्गदर्शन वर्ग कधी सुरुवात होणार –
एमपीएससीने काढलेल्या या पदांच्या परीक्षेसाठी उमेदवारांची परिपूर्ण तयारी व्हावी, यासाठी संपूर्ण मार्गदर्शन वर्गाचे आयोजन हे दर्जी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात होणार आहे. या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी सराव पेपर सोडवून विद्यार्थ्यांचा कसून सराव करण्यात येईल. यासाठी स्वत: प्रा. गोपाल दर्जी हेसुद्धा मार्गदर्शन करणार आहेत.
त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गासाठी माफक फी घेतली जाणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धी परीक्षा उमेदवार हे जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोडवरील दर्जी फाऊंडेशन येथे संपर्क साधू शकतात.