मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 9 ऑक्टोबर : चोपडा तालुक्यातील सुटकार येथे भारतीय जनता पार्टी व कोळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑर्किड हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने आपले आरोग्य तपासणी केली.
सुटकार येथे आरोग्य शिबिर –
गावातील राम मंदिर येथे 10 ते 1 वाजेपर्यंत ऑर्किड हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय टीमने सदर तपासणी केली. शिबिराचे आयोजन कोळी महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष व भाजपाचे तालुका सरचिटणीस विजय बाविस्कर यांनी केले होते. याप्रसंगी भा.ज.पा बूथ प्रमुख शशिकांत नंदलाल ठाकरे, सरपंच रविंद्र ठाकरे, उपसरपंच सागर ठाकरे, शशिकांत ठाकरे, समाधान ठाकरे, ग्रा. प सदस्य प्रवीण ठाकरे, दिनकर ठाकरे आदी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ, महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
हातेड येथे पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपणाचा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न –
कै. निळकंठराव आनंदराव सोनवणे हातेड. (माजी संचालक ज .जि. मराठा विद्याप्रसारक समाज जळगाव) माजी चेअरमन श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हातेड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या 4 थ्या स्मृतीदिनाच्या स्मरणार्थ 175 आम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातेड येथे संपन्न झाला. कार्यक्रमास माजी शिक्षक आमदार तात्यासो दिलीपराव सो, प्रा. चंद्रकांत सनेर, माजी जि. प सदस्य गजेंद्र सोनवणे व माजी मुख्या चंद्रकांत सोनवणे, आश्रमशाळेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे.चोपडा ता. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे. पशुवैद्य किय अधिकारी डॉ कनके व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ होते. ते सेवानिवृत्त शिक्षक अशोक निळकंठ सोनवणे व निवृत्त उच्च सहाय्यक श्री जयवंत निळकंठ सोनवणे यांचे वडील होते.या कार्यक्रमातून एक नवा संदेश समाजाला दिला.हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : माजी आयपीएस अधिकारी Dr. Meeran Chadha Borwankar यांची विशेष मुलाखत