संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 16 सप्टेंबर : पारोळा शहरात जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त सालाबादाप्रमाणे आज 16 सप्टेंबर रोजी समस्त मुस्लिम समाजातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये पारोळा शहरात 160 रक्तदात्यांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिरमध्ये 145 रुग्णांना लाभ मिळाला.
पारोळा पोलिस निरीक्षक सुनिल पवार, जेष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठे, प्र.रमेश जैन, प्र.अभय पाटील प्र.योगेश पाटील, प्र.राकेश शिंदे, सर्व प्रत्रकार बंधू व मराठा सेवा संघ डॉ.शांताराम पाटील, पतंगराव पाटील, महेश पाटील या शिबिरामध्ये भोले विघ्नहर्ता मल्टिप्लेक्स हॉस्पिटल व श्री. साई हॉस्पिटल यांनी अनमोल सहकार्य केले.
भोले विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. राहुल कुवर, डॉ. गिरीश वडगावकर, डॉ. थोरात साहेब व डोळे तपासणी शिबिरामध्ये राकेश राजपूत यांनी व रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर संपन्न झाली. रक्तदानासाठी बाळासाहेब यशवंत गव्हाणे, शुभम दौलत गव्हाणे, समाधान साईनाथ आढाव यांनी अनमोल सरकारी केला.
मुस्लिम समाजातर्फे जुबेर शेख, मोहम्मद पठाण, फारुख शेख, इम्रान शेख, सादिक पिंजारी, फेरोज पिंजारी, डॉ. आसिफ कुरेशी, मोहम्मद खान बेलदार, नईम पटवे, सलीम पटवे, कय्युम खान व आकीफ खाटीक, बिलाल शेख, सलमान सय्यद , हसीब शेख, मोईद्दीन शेख आदींनी सहकार्य केले.
हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची, प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?