पाचोरा, 4 जानेवारी : महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी संप पुकारला. पाचोरा येथे वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत कामगारांच्या या संपाला काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली पाचोरा काँग्रेसने पाठिंबा दिला.
राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आणि अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला होता. या संपाला पाचोरा काँग्रेसने पाठिंबा दिला.
यावेळी संपकरी कामगारांसमोर आमदार सुधीर तांबे, सचिन सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आज जरी अंधार होईल. मात्र, महावितरणचे भविष्य प्रकाशमय राहणार आहे. त्यामुळे कामगारांसोबत जनता देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
यावेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, प्रवीण पाटील, एससी, सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष शंकर सोनवणे, मनोज पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्या आज वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात बैठक झाली. या बैठकीत यशस्वी चर्चा झाली. तसेच बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. या बैठकीत 32 संघटना या चर्चेत सहभागी झाल्या होत्या.