भडगाव, 20 मार्च : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी भडगाव येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. सुरुवातीला दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
भडगाव आणि पंचकोशीतील लोकांसाठी हे मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून वयोवृद्ध व्यक्तींना नवीन दृष्टी प्रदान करण्याचा एक संकल्प घेण्यात आला. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे, अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सुमारे 425 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ.जॅकी शेख, डॉ. विष्णू पाटील आणि त्यांचे सहकारी डॉ. विनोद पाटील यांच्याकडून करून घेण्यात आली.
त्यातील सुमारे 62 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले. रुग्णांची तपासणी, जळगाव येथे येण्या-जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च वैशाली सुर्यवंशी या करत आहेत.
पाचोऱ्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, 360 रुग्णांनी घेतला लाभ
यावेळी यांची होती उपस्थिती –
दरम्यान, यावेळी रमेश बाफना (तालुका प्रमुख शेतकरी सेना), नगरसेवक मनोहर चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, सेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, संदीप जैन (युवासेना उपजिल्हाप्रमुख), शहर संघटक अनिल महाजन, रवींद्र पाटील (युवासेना), चेतन पाटील (युवासेना), नगरसेविका योजना बाई पाटील, शितल मारवाडी, सुषमाताई भावसार, अविनाश पाटील, फकीरा पाटील, डॉ. विजयकुमार देशमुख, भागवत पाटील, मुन्ना शेठ, विठ्ठल पाटील, नवल पाटील, कैलास भावसार, विजय पाटील, मोसिन खाटीक सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर शिबिराच्या यशस्वितेसाठी सुनील पाटील, माधव राजपूत, जे. के. पाटील, अरविंद पाटील, समाधान पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.