ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरेश्वर), पाचोरा : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे आज 29 मार्च रोजी सायंकाळी 18:30 ते 19:30 वाजता गुढीपाडव्याच्या पूर्वसंधेला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या होणाऱ्या पथ संचलन निमित्त पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनच्यावतीने रूट मार्च काढण्यात आला.
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय– छत्रपती संभाजी महाराज चौक – गोथानपुरा – वरसाडे रोड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा –बागवान मस्जिद – रथ चौक-बाजारपेठ या समिश्र लोकवस्तीतुन पोलिसांनी हा रूट मार्च काढला.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे 03 अधिकारी, 10 अंमलदार, 12 पुरुष तसेच 02 महिला होमगार्ड उपस्थित होते.