• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वारकरी संप्रदायाचे पंडित कल्याणजी गायकवाड यांना राज्य शासनाचा ‘कंठसंगीत’ पुरस्कार प्रदान

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला सन्मान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 11, 2023
in महाराष्ट्र
वारकरी संप्रदायाचे पंडित कल्याणजी गायकवाड यांना राज्य शासनाचा ‘कंठसंगीत’ पुरस्कार प्रदान

पं. कल्याणजी गायकवाड यांना मानपत्र देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार.

मुंबई, 11 एप्रिल : वारकरी संप्रदायातील गायक व संगीतकार पंडीत कल्याणजी गायकवाड यांना संगीत क्षेत्रातील मानाचा असा महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पं. कल्याणजी गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काल दिनांक 10-4-2023 रोजी मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

गेल्या 3 दशकांपासून त्यांनी संगीत क्षेत्रात भरीव कार्य केले आहे आणि वारकरी संप्रदायातील हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. तसेच सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाडचे ते वडील आहेत. काल मुंबई त्यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत पुरस्काराने गौरविण्यात आले. ट्रॉफी, मानपत्र आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केल्या या भावना –

पंडित कल्याणजी गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली. हा पुरस्कार केवळ माझा एकट्याचा नसून महाराष्ट्रातील तमाम संगीत रसिक आणि वारकरी संप्रदायातील संगीत साधना करणार्‍या संगीत साधकांचा आहे, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संगीत ही कला सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी अनेक गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने संगीत कला शिकवली आहे. सध्या ते आळंदी येथे वास्तव्यास आहेत. तसेच आळंदीमध्येच ते संगीत कलासाधना करतात. शास्त्रीय गायक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच अभंगाच्या माध्यमातून ते घराघरात पोहचले आहेत. कल्याणजी गायकवाड आपल्या संगीत क्षेत्रातील आपल्या वेगळ्या शैलीमुळे ओळखले जातात. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेले अभंग सुरेश वाडकर, अजय पोहनकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत यांनी गायिले आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: kanth sangeet puraskarkartiki gaikwadmumbaipt kalyanji gaikwadsudhir mungantiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page