संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 27 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकरण समोर येत असताना चक्क पोलिसांनी लाच घेतल्याची बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी आरोपी अटक न करण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून 30 हजाराची लाच मागितली. याप्रकरणी तडजोड अंती आज 15 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. दरम्यान, याप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी मोटार सायकलने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर जात असतांना त्यांच्या मोटारसायकलची समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी धडक होऊन त्यामध्ये समोरील मोटोरसायकल वरील इसम मयत झाले. दरम्यान, तक्रारदार यांचेविरुद्ध पारोळा पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला करण्यात आला होता.
कृपया, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
युट्यूब चॅनल लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करणेकरीता येथील आरोपी हिरालाल देविदास पाटील (वय- 43 रा. अमळनेर) आणि प्रवीण विश्वास पाटील, (वय.45 वर्ष, रा. पारोळा) यांनी तक्रारदार यांचेकडे 30,000/- रु लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती करून तडजोडीअंती 15,000/-रु तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली. याबाबत आज धुळे येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता एकाला फोन करून सांगितले की सदरची रक्कम घेऊन घे व दुसऱ्या आरोपींनी रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तर दुसरा फरार आहे. याबाबत त्यांच्या विरुद्ध पारोळा पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान, धुळे येथील लाच लुचपत विभागातील पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पो.हवालदार. राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे ,जगदीश बडगुजर पो.शि.रामदास बारेला, प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच!, धक्कातंत्राचा वापर होणार का?