सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 18 सप्टेंबर : पारोळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाच्या ईलेक्ट्रीक प्रवाह करणाऱ्या पोलवरील अॅल्युमिनीयम तार चोरी करण्याची घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, ही तार चोरी करणारी टोळी सांगावी शिवारात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, पारोळा पोलिसांनी अधिक तपास करत सदर गुन्हा उघडकीस आणला.
काय आहे संपुर्ण बातमी? –
पारोळा तालुक्यातील सांगवी शिवार परिसरात महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाचे ईलेक्ट्रीक प्रवाह करणारे पोलवरील अॅल्युमिनीयम तार चोरी करणारी टोळी संशयीतरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पारोळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांना मिळाली. यानंतर सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोउनि राजु विठ्ठल जाधव, पोहेकाँ ४१८/सुनिल हाटकर, पोहेकाँ २७१८/प्रविण पाटील, पोकाँ ८५०/अशिष गायकवाड, पोकाँ योगेश शिंदे, पोकों चा अनिल वाघ यांना सरकारी वाहनाने रवाना केले.
सदर परिसरात नमुद पथकास ईसम नामे समाधान नारायण पाटील रा. एरंडोल हा चार चाकी वाहन क्र.MH१९४११९२ काळी-पिवळी टॅक्सी हिचे सह सांगवी ता पारोळा गावाचे शिवारात इले.डी.पी. जवळ मिळुन आला. त्याचे कडेस अधिक चौकशी करता तो उडवा उडविची उत्तरे देता होता त्याची अधिक चौकशी करता त्याचे कब्जात एक तार कापण्याची पक्कड मिळुन आली. दरम्यान, त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने माहीती दिली की, माझे सोबत अजुन दोन साथीदार नामे 1) रविंद्र अनिल मिस्तरी रा-साईनगर एरंडोल व 2) धनराज प्रकाश ठाकुर (रा. अमळनेर) असे असुन ते पळुन गेले आहे, असे सांगितले.
यानंतर त्यास अधिक चौकशी कामी पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचे दोन साथीदार यांचा वर नमुद पोलीस पथकाने तात्काळ अंत्यंत शिताफीने शोध घेवुन ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे कडेस अधिक चौकशी करता वरील तिन्ही आरोपीतांनी पारोळा पो स्टे हद्दीत दोन वेग वेगळया ठिकाणी व एरंडोल पो स्टे हद्दीत तीन वेग वेगळया ठिकाणी ईलेक्ट्रीक अॅल्युमिनीयम तार चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याबाबत पारोळा पोलीस स्टेशन कडील दोन वेग वेगळे गुन्हे व एरंडोल पोलीस स्टेशन कडील तीन वेग वेगळे गुन्हे उघकीस आले आहे.
सदर कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्ष डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.