संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 9 जुलै : सिडबॉल्स कॅम्पेन 2024 आवाहन अंतर्गत माझी वसुंधरा 5.0 नगरपरिषद पारोळा यांच्या सहकार्याने आज श्री स्वामी समर्थ विद्यालय (गोविंद टोलकर), कॉटेज हॉस्पिटल पारोळा ( डॉ प्रशांत रनाळे), राजमाता जिजाऊ नगर (नितिन बडगुजर) या संगोपन कर्त्याच्या उपस्थितीत जवळपास 50 झाडे वृक्षारोपण तथा संगोपन करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ शाळेत विद्यार्थ्यांनी शासनाच्या माझी वसुंधरा 5.0 उपक्रमात वृक्ष संगोपन तसेच हरित क्रांतीची शपथ घेतली. यावेळी कॉटेज हॉस्पिटल येथील माननीय डॉक्टर टीम व सिस्टर । श्री स्वामी समर्थ विद्यालय शिक्षक- शिक्षिका वृंद । श्री नितिन बडगुजर व पर्यावरण दूत डॉ औजेकर, उपप्राचार्य संजय बडगुजर, राहुल निकम, नपा पर्यावरण समन्वयक अक्षय सोनवणे व नपा कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा