• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

विमान अपघातानंतर पंतप्रधान अहमदाबादमध्ये पोहोचले; पीएम मोदी यांच्या आजच्या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 13, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
विमान अपघातानंतर पंतप्रधान अहमदाबादमध्ये पोहोचले; पीएम मोदी यांच्या आजच्या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे

अहमदाबाद, 13 जून : अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी टेकऑफ केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अवघ्या काही क्षणातच काल गुरूवारी 12 जून रोजी दुपारी दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात जवळपास विमानातील एका प्रवाशाला वगळता सर्वच प्रवासी मृत्यूमुखी पडले. या विमान अपघाताच्या घटनेने संपुर्ण देश सुन्न झालाय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये विमान अपघातानंतर भेट दिली.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबाद दौरा –

अहमदाबाद येथे विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये प्रवासी, केबिन क्रू आणि मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील डॉक्टरांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जवळपास 265 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक जण बचावला असून सीट नंबर 11 ए वर बसलेल्या विश्वासकुमार रमेश असे त्याचे नाव आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान अपघाताच्या घटनेनंतर आज अहमदबादचा दौरा केला असून या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे….

1. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची केली पाहणी –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे दाखल झाल्यानंतर विमान अपघात स्थळाची पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी जवळपास 20 मिनिटे ही पाहणी केली. विमान अपघाताची घटना कशी घडली तसेच बचाव कार्य तसेच जखमींना कशापद्धतीने बाहेर काढण्यात आले याबाबतची माहिती पंतप्रधान मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

2. पंतप्रधान मोदींनी रूग्णालयात जखमींची केली विचारपूस –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदबाद येथील सरकारी रूग्णालयात जाऊन विमान अपघातात जखमी झालेल्या रूग्णांची विचारपूस केली. यावेळी जखमी रूग्णांना धीर देत सरकार सर्वोतोपरी मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. दरम्यान, विमान अपघातात बचावलेला  एकमेव प्रवासी म्हणजे विश्वासकुमार रमेश याची देखील नरेंद्र मोदी यांनी भेट घेत त्याच्यासोबत संवाद साधला. यावेळी जखमींसोबत वेळ घालवल्यानंतर तसेच चालू उपचारांचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान रुग्णालयाबाहेर पडले.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक –

एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये नागरी विमान वाहतूक विभागाच्या कार्यालयात केंद्र सरकारमधील मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. तसेच विमान अपघाताची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी महत्वपुर्ण सूचना केल्या.

हेही वाचा : अहमदाबाद विमान अपघात; एका क्षणात घडला अनर्थ अन् 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडंल?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahmedabadair india plane crashmarathi newspm narendra modisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page