ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचारो, 21 एप्रिल : पाचोरा तालुक्यात गुन्हगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, पाचोरा येथील श्रीराम मंदिरातली पाण्याची मोटर चोरीला गेली. दरम्यान, ही मोटर चोरणाऱ्या आरोपीस पाचोरा पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पाचोरा येथील श्रीराम मंदिर मधील विहिरीवर असलेली पाण्याची मोटर ही खराब झाल्या असल्यामुळे तिला दुरुस्ती करण्यासाठीवर काढण्यात आलेली होती. पाण्याची मोटर साधारणता पाच हॉर्स पॉवरची असून तिची किंमत सात ते आठ हजार असून ती रात्री चोरीला गेली. दरम्यान, श्रीराम मंदिराचे पुजारी सूरदास महाराज यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाचोरा पोलिसांत तक्रार नोंदवली.
आरोपीस अवघ्या दोन तासात अटक –
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरू केला. दरम्यान, पाचोरा पोलिसांनी अवघ्या दोन तासात श्रीराम मंदिर परिसरातील सर्व सीसी कॅमेरे चेक करत आरोपीकडून पाण्याची मोटर जप्त करत त्यांला अटक केली. या कारवाईत पाचोरा पोलीस स्टेशनचे डीबी कर्मचारी राहुल शिंपी, योगेश सुरेश पाटील, योगेश अरुण पाटील, गजानन काळे यांनी महत्वपुर्ण कामगिरी केली.