सुनील माळी, प्रतिनिधी
पारोळा, 2 जुलै : जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी नोंदणी करताना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांचा धावपळ सुरू आहे. दरम्यान, या योजनेसाठी कागदपत्रे जमावण्यासाठी महिला तलाठी कार्यालय, तहसिल तसेच आपलं सेतु कार्यालयात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
कागदपत्रांची पुर्तता करूनच संयमाने अर्ज दाखल करा –
पारोळा तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसिल तसेच तलाठी कार्यालयात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली होती. या पार्श्वभूमीवर गर्दी न करता आपली कागदपत्रे प्रथम पूर्ण करून लाभार्थी महिलांनी संयमाने आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, महिलांना उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी पारोळा शहर तलाठी निशिकांत माने यांचे देखील सहकार्य लाभत आहे.
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांची गर्दी –
राज्य शासनाने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली असून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हास्तरावर पत्र काढत प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना करून जनजागृतीही सुरू केली. या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य असून, त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तहसिल तसेच तलाठी कार्यालयात महिलांची गर्दी दिसून आली.
हेही वाचा : समाज सुरक्षित ठेवायचा असेल तर नवीन कायद्याची अंमलबाजवाणी गरजेचे, पो.नि. सुनिल पवार यांचे प्रतिपादन