भुसावळ/ पाचोरा, 26 जून : भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची 172 वी बैठक आज दिनांक 26 जून बुधवार रोजी दुपारी 3 वाजता भुसावळ येथील मध्य रेल मंडळ कार्यालयात भुसावळ विभागाचे भुसावळ रेल प्रबंधक (Drm) इती पांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात भुसावळ मंडळातील विविध स्टेशनवरील समस्या व सूचना सदर स्टेशन वरील सल्लागारांकडून जाणून घेत त्या तात्काळ सोडविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
पाचोरा जंक्शन वरील विविध समस्या व सूचना रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी मांडल्या, तसेच या तात्काळ सोडवून प्रवाशी वर्गाला दिलासा द्यावा, अशा सूचना पाटील यांनी भुसावळ मंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
- पाचोरा रेल्वेस्थानकासाठी मांडलेल्या प्रमुख समस्या व सूचना –
- पाचोरा जंकशन प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले PJ रेल्वे इंजिन बसवून जंकशनच्या सौंदर्यात भर दव्हावी यासाठी प्रयत्न करावेत.
- पाचोरा स्टेशन वरील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ठ कार्य पुरस्काराने गौरविण्यात यावे.
- पाचोरा स्टेशन वर कोच पोझिशन इंडिकेटर, Announcement सिस्टिम, CCTV कॅमेरे लावली जावीत, wifi कार्यान्वित करावे.
- तसेच 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस, व 11113 देवळाली भुसावळ मेमू या ट्रेन्स च्या वेळेत बदल करून पूर्ववत वेळ करण्यात यावी.
- पाचोरा चाळीसगाव स्टेशनवरून Up and Down side ने धावणाऱ्या काही महत्वाच्या ट्रेन्सला थांबा देण्यात यावा.
- मेमू ट्रेन मध्ये सुरु असलेल्या म्युसिकल आवाज कमी करण्यात यावा.
अशा विविध समस्या व नवीन सूचनांचे निराकारण होणेबाबत सुचविण्यात आले.