सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 10 मार्च : पारोळा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील पिंपरी येथे एका नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आज 10 मार्च रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील पिंपरी येथील विशाल नाना पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या पावरा कुटुंबातील 9 वर्षीय बालिकेवर हिरालाल अमरसिंग बारेला (रा. शेनपाणी ता. चोपडा) याने बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपी हिरालाल बारेलावर बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटल्यानुसार, हिरालाल अमरसिंग बारेला याने नर्सरी शेड येथे काम करत असताना माझ्या मुलाला जवळ बोलवून त्याला लिंबूच्या शेतात लिंबू घेण्यासाठी पाठवले आणि माझी मुलगी एकटी तिथे असल्याने तिला एक गोष्ट सांगतो असे सांगून नर्सरी शेडमध्ये घेवून जावून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करित आहेत. दरम्यान, बालिकेस पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा : धक्कादायक! पारोळा येथे 16 वर्षीय मुलीची आत्महत्या, काय आहे संपूर्ण बातमी?