• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Sahitya Sammelan : खान्देशातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विदर्भाच्या सुपूत्राची निवड!

अमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 25, 2023
in महाराष्ट्र, साहित्य-परंपरा
ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे

ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे

पुणे, 25 जून : 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली. पुणे येथे आज साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत रवींद्र शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक यांची नावे चर्चेत होती. त्यातून डॉ. रवींद्र शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

याच बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार झाला आहे. 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रवींद्र शोभणे यांच्याविषयी –

कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला आहे. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. यानंतर नरखेड येथे महाविद्यालयीन शिक्षण, तर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. यानंतर 1989 मध्ये ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. ची पदवी प्राप्त केली.

सध्या प्रा. डॉ. रवींद्र शोभणे हे नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कथा, कादंबरी, नाट्य, कविता, समीक्षा, ललित, अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन करणार्‍या डॉ. रवींद्र शोभणे यांची वयाच्या विसाव्या वर्षी पहिली कविता, पहिला समीक्षात्मक लेख आणि पहिली कथा प्रकाशित झाली होती. सुरुवातीपासूनच वाचनाची प्रचंड आवड असलेले हे व्यक्तिमत्त्व सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक, प्रांतीय स्थित्यंतरांचा जाणीवपूर्वक अभ्यास करीत, परिस्थितीचे डोळसपणे अवलोकन करीत लेखक म्हणून घडत गेले आणि 1983 मध्ये वयाच्या चौतिसाव्या वर्षी त्यांची ‘प्रवाह’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली.

हेही वाचा – खान्देशकन्येची बाजी! पाचोऱ्याच्या विशाखाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 जाहीर

‘सव्वीस दिवस’ सारख्या स्वानुभव कथनात्मक लघू कादंबरी लिहिणार्‍या रवींद्र शोभणेंच्या लेखणीतून ‘उत्तरायण’ ही महाभारतावर आधारित बृहद् कादंबरीही आकारास आली आहे. कथालेखक म्हणूनही डॉ. रवींद्र शोभणे परिचित आहेत. 1991 मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यानंतर 1994 ते 2008 या काळात त्यांचे ‘दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘तद्भव’, ‘अदृष्टाच्या वाटा’ असे पाच कथासंग्रह प्रकाशित झाले.

‘कादंबरीकार श्री.ना.पेंडसे’, ‘सत्त्वशोधाच्या दिशा’, ‘संदर्भासह’ अशी त्यांची समीक्षात्मक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. ‘कथांजली’ आणि ‘मराठी कविता परंपरा आणि दर्शन’ या दोन पुस्तकांचे संपादन डॉ. शोभणे यांनी केलेले आहे. तर ‘ऐशा चौफेर टापूत’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह 2007 मध्ये प्रकाशित झाला.

विविध पुरस्कार प्राप्त –

1992मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कोंडी’ या कादंबरीने त्यांना खर्‍या अर्थाने कादंबरीकार म्हणून लौकिक मिळवून दिला. वैदर्भीय प्रादेशिकतेची वैशिष्ट्ये, वैदर्भीय बोली भाषा, तेथील व्यक्तिमत्त्वे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचा सांस्कृतिक वारसा, त्यांचे राजकीय डावपेच या सर्वांचे वास्तव चित्रण करीत विलक्षण ताकदीने शोभणे यांनी ‘कोंडी’चे कथानक उभे केलेले आहे. त्यांच्या या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले.

त्यांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ल. ठोकळ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार असे काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या मानवी वास्तवाचा नवस्पर्श लाभलेल्या महाभारतावरील ‘उत्तरायण’ या बृहद् कादंबरीला वि.सा.संघाचा पु.ल.देशपांडे पुरस्कार, घनश्यामदास सराफ पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंण्डेशनचा पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, तर त्यांच्या ‘पडघम’ या सामाजिक व राजकीय कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा ह. ना. आपटे पुरस्कार प्राप्त झाला आहे.

1975 ते 1984 या कालावधीतील महाराष्ट्रीय, तसेच भारतीय समाजजीवनातील र्‍हासपर्वाचे, विविध राजकीय पक्ष संघटनांचे, आणीबाणीनंतरच्या राजकीय जीवनाचे असे बहुकेंद्री पडसाद त्यांच्या ‘पडघम’ या महाकादंबरीमध्ये उमटलेले आहेत. तर ‘रक्तधृव’ या आगळ्या आशयाच्या व विचार प्रवृत्त करणार्‍या कादंबरीलाही तल्हार स्मृती पुरस्कार व लोकमत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या चिरेबंद’ या देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी 1995मध्ये प्रकाशित केलेल्या कादंबरीला ग्रंथोत्तेजक पुरस्कार, तसेच रणजीत देसाई पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

डॉ. रवींद्र शोभणे यांना त्यांच्या विविधांगी साहित्यसंपदेची दखल घेणारे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. 2003मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या युवा साहित्यिकाने भूषविले होते. त्यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती 1994 साली प्राप्त झाली. मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून (2007-2012) ते कार्य करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: akhil bharatiya sahitya sammelanakhil bharatiya sahitya sammelan amalneramalner akhil bharatiya sahitya sammelanpune newsravindra shobhne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LIVE: Municipal Corporation Election 2026 Results: Who has won in Jalgaon so far? Live results

LIVE : महानगरपालिका निवडणूक 2026 निकाल : जळगावात महायुतीचा ऐतिहासिक विजय, महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा, कुणी किती जागा जिंकल्या, लाईव्ह निकाल

January 16, 2026
राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

January 16, 2026
जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 16, 2026
Jalgaon Crime News : जळगावात पैशांच्या वादातून तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime News : जळगावात पैशांच्या वादातून तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

January 16, 2026
जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

January 16, 2026
‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page