मुंबई, 10 ऑक्टोबर : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. दिर्घ आजाराने वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी काल रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर सर्वचत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय.
राज्यात एक दिवसाचा दुखवटा –
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार –
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच आज मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले असून राज्य शासनाचे हे सर्व कार्यक्रम दोन दिवसांत घेण्यात येणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
रतन टाटा यांचा परिचय –
रतन टाटा यांचा 28 डिसेंबर 1937 रोजी बॉम्बे, ब्रिटिश भारत आणि सध्याचे मुंबई येथे जन्म झाला. रतन टाटा हे नवल टाटा आणि सुनी कमिशनर यांचे पुत्र होते. रतन टाटा हे 10 वर्षांचे असताना वेगळे झाले. त्यानंतर त्यांना त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी जेएन पेटिट पारसी अनाथाश्रमातून औपचारिकपणे दत्तक घेतलं होतं. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा जे नवल टाटा आणि सायमन टाटा यांचा मुलगा यांच्यासोबत एकत्र मोठे झाले होते.
टाटा समूहाचा केला विस्तार –
देश-विदेशात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि 1991 मध्ये रतनजी टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्को (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. यासोबतच टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते.
सामाजिक बांधिलकी काय स्मरणात राहणारी –
रतन टाटा हे टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते. दरम्यान, 2008 च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहणारा आहे. तसेच त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे. तसेच देशाच्या विकासात त्यांचे खूप मोठे योगदान राहिलंय.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. राणी बंग यांची विशेष मुलाखत