• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

शाश्वत विकासात आदिवासींची भूमिका महत्वाची, चैत्राम पवार यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 11, 2024
in धुळे, ताज्या बातम्या
शाश्वत विकासात आदिवासींची भूमिका महत्वाची, चैत्राम पवार यांचे प्रतिपादन

मोराणे (धुळे), 11 ऑक्टोबर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार ( पीएम- उषा ) या अंतर्गत एक दिवशीय आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा काल 10 ऑक्टोबर 2024 आयोजित करण्यात आली.या कार्यशाळेचे उद्धघाटन चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शाश्वत विकासात आदिवासींची भूमिका महत्वाची –
चैत्राम पवार यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ ही संत-महात्म्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे. भारतीय संस्कृती पाहिली तर आपण निसर्ग पूजक समाजात राहतो. आपल्या विविधतेत एकता आहे आणि त्यात सर्वत्र निसर्गपूजन आहे. वृक्षांची पूजा करणे, त्यांचे संगोपन व रक्षण करणे, त्यांना देव मानणे, प्राण्यांची पूजा करणे, त्यांना नमस्कार करणे, त्याचप्रमाणे झाडांचा केवळ औषधी म्हणून वापर करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेले आहे. वनवासी समाजाने नेहमीच या जंगलांचे रक्षण केले आहे, तसेच सेवाही केली आहे व करत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आदिवासी समाज नेहमीच पुढे असतो म्हणजेच शाश्वत विकासात आदिवासींची भूमिका महत्वाची ठरत आहे, असे प्रतिपादन केले.

हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ‘श्यामची आई’ फेम मराठी अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखत

अभ्यास आणि संशोधने होणे गरजेचे –
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. शिवाजी पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य -कबचौउमवि, जळगाव) यांनी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार ( पीएम- उषा ) अंतर्गत कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या योजना अंतर्गत 50 कोटी जळगाव विद्यापीठात मिळाले आहेत. त्यातून काही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतील विद्यार्थी कार्यशाळासाठी जास्तीत जास्त खर्च करणार आहोत त्यातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी व स्व कल्याण नव्हे तर समाजाचे कल्याण व्हावे हा उद्देश आहे. आदिवासी जमातीतील आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर अभ्यास आणि संशोधने होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

डॉ. शैलेश पटेल (सहाय्यक प्रकल्प अधिकारी, धुळे) यांनी आदिवासी विकास विभाग आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतो. आदिवासी समाजांना सामुदायिक लाभ दिला जातो. आदिवासींमधील शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आदिवासी विकास विभाग मोठया प्रमाणावर काम करत आहे. जल, जंगल, जमीन आणि शाश्वत विकास यावर आदिवासी समाजासाठी आदिवासी विकास भर देत आहे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विष्णू गुंजाळ (प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, धुळे) यांनी अध्यक्षीय समारोपाची सुरुवात आदिवासी बोलीभाषेतून केली. आदिवासींच्या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आदिवासींच्या मूलभूत गरजा व त्यांच्या चालत आलेल्या पारंपरिक रूढी परंपरा यासाठी आपण काय करू शकतो हा विचार, आपला विचार करून ते प्रत्यक्षात उतरून आदिवासींचे कल्याण करणे गरजेचे आहे. आदिवासींचा शैक्षणिक विकास वाढला पाहिजे. आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी दुर्गम भागातून येतात त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. एकात्मिक आदिवासी विकास मार्फत त्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे. आदिवासींचा इतिहास पुढे आलेला नाही. त्यासाठी काही संदर्भ वापरून, माहिती जमा करून आपण लिखाण करून पुस्तके लिहून आदिवासींचा इतिहास जगासमोर मांडू शकतो. विविध कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवली गेली पाहिजे तसेच या कौशल्यांचा विद्यार्थ्यांनी वापर केला पाहजे असे प्रतिपादन केले.

हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉ. राणी बंग यांची विशेष मुलाखत

पहिल्या सत्रात मा. चैत्राम पवार यांनी “आदर्श गाव बारीपाडा आणि आदिवासी समुदाय विकास” याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात मा. इशिता चव्हाण (आगा खान ग्रामीण सहाय्य कार्यक्रम, भारत), मा. त्रिलोक गुप्ता (आगा खान ग्रामीण सहाय्य कार्यक्रम, भारत) यांनी “आदिवासींची उपजीविका” याबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात मा. डॉ. वैभव सबनीस ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे) यांनी “जीवन कौशल्य” या विषयावर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात मा. डॉ. मोहन पावरा (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य – कबचौउमवि, जळगाव) यांनी “आदिवासींचे सामाजिक-आर्थिक प्रश्न” याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. दिलीप घोंगडे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. प्रा. डॉ. फरीदा खान, प्रा.डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा, डॉ. प्रीती वाहने, प्रा. डॉ. मेघावी मेश्राम, प्रा. डॉ. सुदाम राठोड तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कार्यशाळेच्या आयोजनात सहकार्य लाभले. कार्यशाळेत जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील एकूण 100 आदिवासी विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.

हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: chaitram pawardhule latest newssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page