मुंबई, 10 डिसेंबर : महाराष्ट्राच्या मनोरंजन सृष्टीतून एक मोठी आणि दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी आज वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं.
मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर आज त्यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका अशी त्यांची ओळख होती. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचे पुत्र विजय चव्हाण यांनी दिली. तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ त्यांनी मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले होते. यानंतर आता ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.