• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Dhule News : शिक्षकाला ब्लॅकमेल केलेल्या ‘त्या’ तरुणीची कारागृहात आत्महत्या, धुळ्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, धुळे
accused girl suicide in jail dhule news

शिक्षकाला ब्लॅकमेल केलेल्या 'त्या' तरुणीची कारागृहात आत्महत्या, धुळ्यातील धक्कादायक घटना

धुळे – धुळे येथील कारागृहात बंदी असलेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नंदुरबार येथील एका शिक्षकाला मैत्रीच्या जाळ्यात ओढून या तरुणीने 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी या तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. तसेच तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, या बंदीवान तरुणीने कारागृहातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

नेमकं काय घडलं –

चंद्रमा बैरागी असे या 20 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. काल मंगळवारी ही घटना समोर आली. न्यायालयीन कोठडीत असलेली ही तरुणी काल 21 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जेवणाच्या वेळी बरेकसमोर हजर न राहिल्याने तिचा शोध घेण्यात आला. यावेळी तिचा शोध घेतला असता ही तरुणी महिला कर्मचारी कार्यालयाच्या मागे ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच तुरुंगाधिकारी व अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारागृह वैद्यकीय अधिकारी एस. एस. पाटील यांनी तपासणी करुन या तरुणीला मृत घोषित केले.

कारागृह अधीक्षकांनी दिली ही माहिती –

माध्यमांशी बोलताना धुळे कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सकाळी 11.15 ते 11.30 वाजेच्या सुमारास कारागृहातील न्यायालयीन बंदी चंद्रमा संजय बैरागी ही महिला देवपूर पोलीस ठाणेमार्फत दोन दिवसांपूर्वी कारागृहात दाखल झाली होती. यानंतर तिने आज (मंगळवारी) महिला विभागातील हॉलच्या मागे बाथरुमला जात असल्याचे सांगून तिने त्याठिकाणी आत्महत्या केली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून न्यायाधीशांसमोर पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाणे धुळे शहर यांच्यावतीने केला जात आहे.

कुटुंबीयांचा आक्रोश – 

दरम्यान, या तरुणीची आत्महत्येची घटना समोर येताच तिच्या कुटुबीयांनी एकच आक्रोश केला. तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणी करण्यात आली होती अटक –

धुळ्यातील या तरुणीने नंदुरबार येथील शिक्षकाशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. यानंतर या शिक्षकाशी मैत्री केली. तसेच 11 जानेवारी रोजी शिक्षकाला आपल्या घरी बोलावले. त्यानुसार 12 रोजी नंदुरबार येथील शिक्षक धुळे येथे मुलीच्या घरी आला. यानंतर थोड्या वेळातच 3 संशयित मुलीच्या घरात शिरले आणि त्यांनी शिक्षकाचे मुलीसोबत अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यानंतर तिघांनी शिक्षकाला शिवीगाळ केली तसेच 12 लाखांची खंडणीची मागणी केली, असा आरोप तिच्यावर होता.

हेही वाचा – सोशल मीडियावर मैत्री, मुलीने शिक्षकाला ब्लॅकमेल करत मागितली 12 लाखांची खंडणी, धुळ्यात सेक्सटॉर्शनचा डाव उधळला

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimedhule citydhule city police stationdhule newsmarathi newssextortionsocial media

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page