• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

chalisgaon crime : धक्कादायक बातमी, गोळीबाराच्या घटनेत चाळीसगावमधील माजी नगरसेवकाचा मृत्यू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2024
in चाळीसगाव, क्राईम, जळगाव जिल्हा
chalisgaon crime : धक्कादायक बातमी, गोळीबाराच्या घटनेत चाळीसगावमधील माजी नगरसेवकाचा मृत्यू

चाळीसगाव (प्रतिनिधी) 10 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात तीन दिवसांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यानंतर त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीनं नाशिकच्या अशोका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

तीन दिवसांपूर्वी झाला होता गोळीबार – 

भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे हे बुधवारी 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयात शिरून काही कळण्याच्या आतच मोरे यांच्यावर गोळीबार केला आणि गोळीबारानंतर कारमधून घटनास्थळावरून अज्ञात आरोपी फरार झाले. दरम्यान, यानंतर आज पहाटे उपचारादरम्यान, महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्यात सलग गोळीबाराच्या घटना – 

दरम्यान, मागच्या अगदी काही दिवसात राज्यात गोळीबाराच्या सलग तीन घटना समोर आल्या आहेत. उल्हासनगर येथे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर बुधवारी चाळीसगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच परवा गुरुवारी दहीसर येथे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp corporatorchalisgaon crimecrime news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

November 2, 2026
Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

Special Report: मिशन सुधार अंतर्गत अपात्र शिधापत्रिका मोहिम; जळगाव जिल्ह्यात अपात्र लाभार्थी वगळल्याने रेशनचा इष्टांक वाढला

November 2, 2026
पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

November 2, 2026
Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page