• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ISO प्रमाणित ग्रामपंचायतींमध्ये धरणागाव तालुका आघाडीवर, बोदवड सर्वात मागे; तुमचा तालुका नेमक्या किती नंबरवर?, वाचा स्पेशल रिपोर्ट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 6, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
ISO प्रमाणित ग्रामपंचायतींमध्ये धरणागाव तालुका आघाडीवर, बोदवड सर्वात मागे; तुमचा तालुका नेमक्या किती नंबरवर?, वाचा स्पेशल रिपोर्ट

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 29 डिसेंबर : राज्यात ग्रामीण भागातील तसेच ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानास आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर ग्रामपंचायतींच्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत.

ISO प्रमाणित ग्रामपंचायतींची जळगाव जिल्ह्याची आकडेवारी –

जळगाव जिल्ह्यातील 1160 ग्रामपंचायतीपैकी 401 ग्रामपंचायती ISO मानांकन प्रक्रियेत वेगाने सहभागी झाल्या आहेत. यामध्ये 234 ग्रामपंचायतींचे आयएसओ नोंदणी पुर्ण झाली आहे तर 167 ग्रामपंचायती ISO प्रमाणित झाल्या आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील आयएसओ प्रमाणित ग्रामपंचायतींची सरासरी 14.4% इतकी असून धरणगाव तालुक्यात सर्वाधिक 30 तर बोदवडमध्ये सर्वाधिक कमी 2 आयएसओ प्रमाणित ग्रामपंचायत आहेत.

आयएसओ ग्रामपंचायत म्हणजे काय? –
जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’शी बोलताना सांगितले की, आयएसओ ग्रामपंचायत म्हणजे अशी ग्रामपंचायत जी शिस्तबद्ध, पारदर्शक आणि ग्रामस्थांना वेळेत सेवा देण्याच्या उद्देशाने ISO (International Organization for Standardization) या आंतरराष्ट्रीय संस्थेने ठरवलेल्या गुणवत्ता मानकांनुसार निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार काम करते.

आयएसओ मानांकनासाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतींच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेनंतर ग्रामपंचायतींची निरीक्षण (तपासणी) प्रक्रिया पार पाडून त्यांना आयएसओ प्रमाणीकरण प्रदान करण्यात येते.

जळगाव जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायती आयएसओ प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून यापैकी साधरणतः 250 ग्रामपंचायती आयएसओ प्रमाणित झाल्या आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने प्रशासनाला वेळ मिळालाय. यामुळे दुसऱ्या टप्प्यात 250 ग्रामंपचायती आयएसओ प्रमाणित करण्यात येणार आहेत. तसेच आयएसओ ग्रामपंचायतींमुळे नागरिकांना सेवेची हमी मिळते आणि प्रशासनाची कार्यपद्धती निश्चित होते.

  • भाऊसाहेब अकलाडे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद जळगाव

ग्रामपंचायतींच्या ISO मानांकन प्रक्रियेला वेग –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अव्वल येणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल 245 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायतींच्या ISO मानांकन प्रक्रियेला वेग आला आहे. तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजाची गुणवत्ता निश्चित करण्यावर भर दिला जात असल्याचे प्रशानाकडून सांगण्यात आले आहे.

गारखेडा ग्रुप ग्रामपंचायत ही आयएसओ मानांकन प्राप्त करणारी जामनेर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. आयएसओ मानांकनामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आली असून नागरिकांची रखडलेली कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत झाली आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात पूर्वीपेक्षा खूप मोठे आणि सकारात्मक बदल झाले आहेत. तसेच विविध हेल्पलाईन नंबर देखील ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

  • फकिरा दराडे

ग्रामपंचायत अधिकारी (गारखेडा खु. गंगापूरी ग्रुप ग्रामपंचायत)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास मुदतवाढ –
राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. येत्या 31 डिसेंपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार होते. मात्र, राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांनी अभियानाकडे दुर्लक्ष करत पूरग्रस्तांना मदत केल्याने अभियानाची कामे मागे पडली होती. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने या अभियानास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा : पारदर्शक कारभाराकडे वाटचाल!, जळगाव जिल्ह्यात ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या निगराणीत

बातमी शेअर करा !
Share
Tags: iso gram panchayatiso gram panchayat listmukhyamantri samriddh panchyatraj abhiyanspecial article

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page