ईसा तडवी, प्रतिनिधी
चाळीसगाव, 20 एप्रिल : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गिरणा विद्या प्रसारक मंडळाचे हायस्कुलच्या दहावीच्या 2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे एक दिवसीय स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. दरम्यान, चाळीसगाव येथील कमलशांती पैलेस हॉल येथे पार पडलेल्य या स्नेह संमेलन सोहळ्यात 25 वर्षानंतर भरली बाल मित्रांची शाळा अन् आठवणींना मिळाला उजाळा, अशी भावना व्यक्त करण्यात आल्या.
माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन –
चाळीसगावात मेहुणबारे गिरणा विद्या प्रसारक मंडळाचे हायस्कुलच्या दहावीच्या 2000 बॅचच्या जुन्या मित्रांचे पुनर्मिलनाचे आकर्षक आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे दोन्ही भाग – मेहुणबारे हायस्कूल (GVPMS Highschool Mehunbare) आणि चाळीसगांव येथील कमलशांती पैलेस हॉल – यशस्वीपणे पार पडले. सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान शाळेचा फेरफटका घेऊन वर्गभेटीसह फोटोसेशन आयोजित करण्यात आला ज्याने जुन्या आठवणी ताज्या केल्या.
यानंतर साडे अकरा वाजता चाळीसगांव येथील कमलशांती पैलेस हॉलमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन, सूत्रसंचालकाचे स्वागत भाषण आणि प्रमुख पाहुण्यांचे/शिक्षकांचे मार्गदर्शन या भागात करण्यात आले. कार्यक्रमाची ओळख व पुनर्मिलनाच्या उद्देशाची संक्षिप्त मांडणी करण्यात आली ज्यामुळे उपस्थितांना कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित झाले.
दरम्यान, वर्गमित्रांनी जलद ओळख परेड झाली. पुढील सत्रात ‘आठवणींचा सैर – संवाद आणि अनुभव शेअरिंग’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवासाची, यशोगाथांची आणि जुन्या फोटो-व्हिडिओंचे सादरीकरण केले. या प्रसंगी उपस्थित शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्लांट्स देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात, कायमच्या स्मृती म्हणून जेष्ठ शिक्षक व दिवंगत मित्रांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. जेवणावकाशात सर्वांनी एकमेकांशी अनौपचारिक चर्चा केली. यानंतर गट खेळ जसे की म्युझिकल चेअर्स, नृत्य आणि गायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मनोरंजनाची मजा द्विगुणित करण्यात आली.
या कार्यक्रमात मुक्त चर्चेच्या माध्यमातून पुढील भेटी, WhatsApp ग्रुपद्वारे जोडले राहण्याचे उपक्रम आणि सामाजिक उपक्रमांबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच गंभीर आजाराने ग्रस्त मित्र आणि दिवंगत मित्रांच्या कुटुंबासाठी मदत करावी असे ठरले. समारोपिक भाषणानंतर गट फोटो सेशन आणि निरोपपर चहा/कोल्ड ड्रिंकने संध्याकाळी साडे पाच वाजता कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम दिवसभर आठवणी, आनंद आणि एकमेकांच्या सहवासाच्या भावनेने भारला होता. हा दिवस सर्वांसाठी नवीन उमेदी आणि पुढील भेटीची प्रेरणा घेऊन गेला, ज्याने जुन्या आठवणींना पुन्हा जिवंत केले. याप्रसंगी लहान भेटवस्तूंचे तसेच फोटो फ्रेमचे वितरण करून सर्व वर्ग मित्रांचा सन्मान करण्यात आला. तसेच भेट म्हणून प्लांट्स ही देण्यात आले.
या प्रसंगी शिक्षक म्हणून तुळशीराम राणे, पी ए पाटील, सुधाकर वाघ, प्राचार्य बैसाने मॅडम, एस महाजन, प्रकाश येवले, कापडणे सर, अहिरराव सर, पडोळसे सर, सुबोध वाघ, पारेराव सर, जगताप सर, अमृतकर सर, वंजारी सर, राहुल साळुंखे, शेख सर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीतील एसएससी 2000 बॅचच्या प्रविण चव्हाण, संदेश येवले, डॉ प्रशांत अमृतकर, भूषण राजपूत, चेतन धनगर, प्रज्ञा पाटील, कविता चौधरी, प्रशांत सोनवणे, कैलास साळुंखे. डॉ स्वप्निल देवकर, राहुल अमृतकर यांनी मेहनत घेतली.