ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 15 एप्रिल : भडगाव तालुक्यातील भातखंडे बुद्रूक येथील शहीद जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार चिमणराव आबा पाटील यांच्यासह जि. प. चे माजी सदस्य दिनकर पाटील, शहीद जवान यांचे वडील विठ्ठल पाटील, आई प्रमिला पाटील, पत्नी ज्योतीबाई पाटील. मुली चिन्मय व विणू उपस्थित होत्या. यासोबतच गिरडचे माजी सरपंच मराठा आबा, अतुल महाजन, भास्कर पाटील, विठ्ठल पाटील, पंडित बापू, नितीन पाटील, मनोज पाटील, राहुल पाटील, सैन्यदलातील जवान तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शहीद जवान दत्तात्रय पाटील यांचा परिचय –
भातखंडे बुद्रूक येथील शहीद जवान जवान दत्तात्रय पाटील हे मार्च 2003 मध्ये नाशिक येथे सैन्य दलात भरती होत 305 फिल्ड रेजिमेंटमध्ये ते सेवेत होते. यानंतर त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद आणि बंगळूर या ठिकाणी झालं होतं. आहे. तसेच दत्तात्रय पाटील यांनी सिक्कीम, जम्मू, बिकानेर, लेह, लडाख या ठिकाणी सेवा बजावली. दरम्यान, त्यांची बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी पोस्टिंग झाली. यादरम्यान, जुलै 2022 मध्ये त्यांचे निधन झाले.
शहीद जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील यांचे युनिट बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी जात असताना गोरखपूरजवळ रेल्वे प्रवासात त्यांची अचानक तब्येत बिघडली. यानंतर पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दत्तात्रय पाटील यांचे निधन झाले.
हेही वाचा : ‘ठाकरेंना भाजपसोबत सत्तेत यायचंय!’ शिंदे गटातील मंत्र्यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?